डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेस आजपासून प्रारंभ

Share

पालघर (प्रतिनिधी) : कोरोनाचे संकट संपल्यानंतर दोन वर्षापासून बंद असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेला शनिवार १६ एप्रिलपासून सुरुवात होत असून ही यात्रा सतत पंधरा दिवस चालणार आहे.

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई – अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरात, राजस्थान, मुंबई, पुणे येथील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. सुरतमधील भाविकांचीही या देवीवर विशेष श्रध्दा आहे.

महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राज घराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी – चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो, ही प्रथा अजूनही परंपरेनुसार सुरू आहे.

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीचे बारसी, नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात होतात. यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो. या शक्तीमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय आपली कुलस्वामीनी मानतो. या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील सातवी कुटुंबातील आहेत. या चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी दिली.

Recent Posts

जगात महिलांची पाटी कोरीच! पण भारतीय जनता पार्टीने दिली महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत फक्त २३५ महिलांनाच मिळाले तिकीट नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा…

29 mins ago

Covishield Covid Vaccine : लस बनवणाऱ्या कंपनीने कोर्टात दिली कोरोना लसीचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याची कबूली!

नवी दिल्ली : कोरोना काळामध्ये जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरलेल्या कोरोना लस निर्मिती करणा-या कंपनीने (Covishield…

52 mins ago

School Admission : शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी हे वाचा!

महाराष्ट्रात ६६१ तर मुंबईत १८६ बेकायदेशीर शाळा, नवी मुंबईतही ५ शाळा अनधिकृत नवी मुंबई :…

1 hour ago

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेची बोचरी टीका मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी…

1 hour ago

suicide: पतीने खर्चासाठी आईला दिले पैसे, चिडलेल्या बायकोने दोन मुलांसह घेतली विहीरीत उडी

लखनऊ: उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या दोन…

3 hours ago

Lok Sabha Election 2024: काँग्रेसला ६० वर्षात जमले नाही ते या सेवकाने १० वर्षात करून दाखवले – पंतप्रधान मोदी

मुंबई: महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Pm narendra modi) आज निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली. यावेळी…

4 hours ago