Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीLS 2024 : महायुतीनंतर मविआतही माढ्याचा तिढा कायम!

LS 2024 : महायुतीनंतर मविआतही माढ्याचा तिढा कायम!

महादेव जानकरांची शरद पवारांकडे माढा रासपला देण्याची मागणी

मुंबई : माढा मतदारसंघ महायुतीसाठी (Mahayuti) तणावाचा विषय ठरत असतानाच आता हाच मतदारसंघ मविआसाठीही (MVA) डोकेदुखी होऊन बसला आहे. माढ्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही असताना महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) रासपसाठी तर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शेकापसाठी शरद पवारांकडे माढ्याची मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी (LS 2024) माढा मतदारसंघ सध्या तरी राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर माढ्याच्या तिढ्यात पडले आहेत. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यावरून अकलूज येथील मोहिते पाटील परिवार कमालीचा नाराज झाला आहे. मोहिते पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत असताना, महादेव जानकर यांनी माढ्याचा तिढा आणखीन वाढवला आहे. माढा लोकसभा मतदार संघाची जागा महाविकास आघाडीने रासपला द्यावी, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.

महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात रस्सीखेच सुरू असताना शेकाप आणि रासपने माढ्याच्या जागेवर उमेदवार देण्याची मागणी केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने वीस जणांची यादी जाहीर करताच माढ्याचा तिढा वाढला आहे. मोहिते पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव वीस जणांच्या यादीत आलं आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा पत्ता कट झाला. धैर्यशील मोहिते पाटील यांचा पत्ता कट झाल्याने रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यात बैठकी झाल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील शिवरत्न बंगल्यात जाऊन मोहिते पाटील परिवाराची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, धैर्यशील पाटील यांनी बंडाचा झेंडा कायम ठेवत अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून मंगळवारपासून गावभेटी सुरू केल्या आहेत.

शेकापनेही केली माढ्याची मागणी

शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत महाविकास आघाडीकडून दिवंगत माजी आमदार गणपत राव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. जयंत पाटील यांनी अधिकृतपणे माध्यमांना माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेत माढा लोकसभेत रासपच्या उमेदवाराला उमेदवारी द्या, अशी मागणी करत रासपचा दावा ठोकला आहे. मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील तिढा अजून सुटलेला नसताना महादेव जानकर यांनी माढ्याच्या तिढ्यात उडी घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -