Tuesday, May 21, 2024
HomeदेशRajya Sabha Elections : राज्यसभेसाठी भाजपकडून १४ उमेदवारांची यादी जाहीर

Rajya Sabha Elections : राज्यसभेसाठी भाजपकडून १४ उमेदवारांची यादी जाहीर

कोणाकोणाला मिळाली संधी?

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुका (Rajya Sabha Elections ) २७ फेब्रुवारीला पार पडणार आहेत. देशभरातून राज्यसभेच्या ५६ जागांसाठी यावेळी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने १४ उमेदवारांची (BJP Candidates) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील सात, बिहारमधील दोन तर छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि प. बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

कोणाकोणाला मिळाली संधी ?

उत्तर प्रदेश – डॉ. सुधांशू त्रिवेदी, आर. पी. एन. सिंह, साधना सिंह, तेजवीरसिंह चौधरी, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, नवीन जैन

बिहार – डॉ. धर्मशीला गुप्ता आणि डॉ. भीम सिंह

कर्नाटक – नारायण भांडगे

छत्तीसगड – देवेंद्र प्रताप सिंह

हरियाणा – सुभाष बराला

उत्तराखंड – महेंद्र भट

पश्चिम बंगाल – सामिक भट्टाचार्य

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक दहा जागा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा जागांचा समावेश आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -