Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रलासलगाव पोलिसांची बनावट ऑईल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

लासलगाव पोलिसांची बनावट ऑईल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

लासलगाव (वार्ताहर) : लासलगाव व विंचुर येथे कॅस्ट्रोल कंपनीचे बनावट ऑईल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर लासलगाव पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.

या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फरमान कबीर हसन रा. उद्योग विहार गुरगाव, हरियाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलमांतर्गत इम्तियाज इसाक काजी रा. पिंपळगाव नजीक, मनीष अशोकराव खुटे रा. पिंपळगाव नजीक, नीलेश भीम शर्मा रा. लासलगाव तसेच संतोष जगन्नाथ राऊत रा. विंचूर तालुका निफाड हे कॅस्ट्रॉल कंपनीचे बनावट ऑइल विकत असल्याची फिर्याद दिल्याने या सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १९,६९१ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे, पोलीस हवालदार कैलास महाजन, संदीप शिंदे, प्रदीप आजगे, सागर आरोटे, सुजय बारगळ, कैलास मानकर व देवीदास पानसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -