Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीनिवडणूक लढण्यासाठी ज्योती मेटेंनी दिला नोकरीचा राजीनामा...

निवडणूक लढण्यासाठी ज्योती मेटेंनी दिला नोकरीचा राजीनामा…

बीडमध्ये मुंडे-मेटे रंगणार लोकसभेचा सामना

मुंबई/बीड (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना पक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने ही लढाई रंगतदार होत आहे. गेल्या ४ वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना भाजपाने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे, पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त करत प्रचाराचा शुभारंभही केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंविरुद्ध कोण, असा प्रश्न असतानाच आता ज्योती मेटेंनी निवडणूक लढण्याची घोषणाच केली आहे.

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे. बीड लोकसभा मतदारसंघावरही त्यांनी विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वीच गतवर्षीचे पराभूत उमेदवार बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतला आहे. दुसरीकडे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशीही शरद पवारांनी तब्बल दीड तास चर्चा केली. ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदी बाग इथे शरद पवारांची भेट घेतली असून बीड लोकसभेबाबत पवार आणि मेटे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेना तगडे आव्हान बीडमधून देण्यात येणार असल्याचे दिसून येते.

शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या विनायक मेटेंच्या पत्नी असल्याने ज्योती मेटेंच्या भूमिकेकडे मराठा समाजाचेही लक्ष लागले आहे. त्यातच, ज्योती मेटेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून आता निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे म्ह्टले आहे. शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील चर्चेनंतर ज्योती मेटेंनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच, कोणत्या पक्षाकडून की अपक्ष, ह्याबाबत आपण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -