Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: एका धावेने RCBचा पराभव, रोमहर्षक सामन्यात केकेआरचा विजय

IPL 2024: एका धावेने RCBचा पराभव, रोमहर्षक सामन्यात केकेआरचा विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(indian premier league 2024) ३६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एका धावेने हरवले. रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आरसीबीला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ २० षटकांत २२१ धावांवर बाद झाला. आरसीबीचा हा सलग सहावा पराभव आहे. तर कोलकाताचा सात सामन्यांपैकी पाचवा विजय आहे.

या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीला विजयासाठी २१ धावा हव्या होत्या. मिचेल स्टार्कच्या त्या ओव्हरमध्ये कर्ण शर्माने तीन षटकार लगावले. दरम्यान पाचव्या बॉलवर कर्णला मिचेल स्टार्कने कॉट अँड बोल्ड आऊट केले. आरसीबीला एका बॉलवर तीन धावा हव्या होत्या मात्र लॉकी फर्ग्युसन दुसरी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. जर फर्ग्युसन दुसरी धाव घेण्यात यशस्वी ठरला असता तर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला असता.

जॅक्स-रजतचे अर्धशतक

आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात चांगली झाली नाही आणि ३५ धावांपर्यंत त्यांनी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची विकेट गमावली होती. यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी करत आरसीबीला सामन्यात परतवले. जॅक्स आणि पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी झाली. जॅक्सने ४ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ३२ बॉलमध्ये ५५ धावा केल्या. तर पाटीदारने केवळ २३ बॉलमध्ये ५२ धावांची खेळी केली. पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ३ चौकार आणि पाच षटकार लगावले.

जॅक्स बाद झाल्यानंतर कोलकाताने सामन्यात पुनरागमन केले आणि आरसीबीचा संघ एका वेळेस सहा बाद १५५ धावा होत्या. सुयश प्रभूदेसाई आणि दिनेश कार्तिक यांच्यात ३२ धावांची पार्टनरशिप झाली. त्यामुळे सामना रोमहर्षक झाला. कार्तिक-प्रभूदेसाई बाद झाल्यानंतर असे वाटत होते की कोलकाता आरामात जिंकेल मात्र शेवटच्या षटकांत कर्ण शर्माने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले. कोलकाताने आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन विकेट मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -