Sunday, May 19, 2024
Homeदेशउद्योजकतेला चालना देण्यासाठी तरुणांना सहभागी करा

उद्योजकतेला चालना देण्यासाठी तरुणांना सहभागी करा

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘देशाला आर्थिक विकासाकडे नेणाऱ्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी तरुणांना सहभागी करून घ्या’, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे बुधवारी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील जागरूकता कार्यक्रम ‘संभव’चा त्यांनी प्रारंभ केला. बंधित व्यवसाय किंवा क्षेत्रांना चालना देण्यासाठी नवोदित उद्योजकांनी तयार केलेली नवीन उत्पादने आणि सेवा एक लाभदायी परिणाम देऊ शकतात, यावर त्यांनी भर दिला. मंत्री महोदय राणे यांच्यासमवेत राज्यमंत्री

भानुप्रताप सिंग वर्मा आणि एमएसएमईचे सचिव बी. बी. स्वेन हे उपस्थित होते. यावेळी बोलताना भानुप्रताप सिंग वर्मा यांनी स्थूल राष्ट्रीय उत्पादन, जीडीपी सध्याच्या ३० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि एमएसएमई क्षेत्रातील रोजगार निर्मिती ११ कोटींवरून १५ कोटींवर नेणे यावर भर दिला. भविष्यात भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम एक महिना चालणारा उपक्रम आहे. ज्यामध्ये देशाच्या सर्व भागांतील विविध महाविद्यालये,आयटीआय (तंत्रशिक्षण संस्था)मधील विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या १३० क्षेत्रीय कार्यालयांद्वारे उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले जाईल.

मोहिमेदरम्यान एमएसएमई मंत्रालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची दृकश्राव्य चित्रफितींच्या सादरीकरणाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याबद्दल जागृती केली जाईल. देशभरातील १,३०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये हे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. यात १,५०,००० विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -