Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीInterest Rates: पोस्ट ऑफिस की बँक, RDवर कुठे मिळेल जास्त फायदा

Interest Rates: पोस्ट ऑफिस की बँक, RDवर कुठे मिळेल जास्त फायदा

मुंबई: भारतीय कुटुंबांना छोटी छोटी बचत करून भविष्यासाठी पैसा जमा करण्याची चांगली सवय आहे. या छोट्या सेव्हिंग स्कीमसाठी बँक तसेच पोस्ट ऑफिसमधील(post office) रिकरिंग डिपॉझिटला(RD) पसंती दिली जाते. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत पोस्ट ऑफिसने आरडीवरील व्याजदर ६.७ टक्के केले आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत की पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करावी घ्या जाणून…

रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय?

आरडी एक प्रकारचा सिस्टमेटिक सेव्हिंग प्लान आहे जिथे तुम्ही दर महिन्याला बचत करून काही पैसे काही वर्षांपर्यंत जमा करू शकता. हा पैसा आरडीचा कालावधी पूर्ण झाल्यावर व्याजासह परत मिळतो. याला मध्यमवर्गातील लोकांची मोठी पसंती असते.

बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये RD वेगळी कशी

बँक आणि पोस्ट ऑफिसमधील RDमध्ये सगळ्यात मोठे अंतर वेळेचे आहे. बँक तुम्हाला RD साठी ६ महिने ते पाच वर्षांपर्यंतचा कालावधी निवडण्याची संधी देते तर पोस्ट ऑफिसमध्ये केवळ पाच वर्षांची RD होऊ शकते.

व्याजदरात किती आहे फरक

जर आरडीवरील व्याजदराबाबत बोलायचे झाल्यास काही खासगी बँकाच पोस्ट ऑफिसच्या पुढे आहेत. अधिकतर बँक एफडीवर पोस्ट ऑफिसपेक्षा कमी व्याज देतात. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा अधिक व्याजदर देत आहेत. यांचे व्याजदर ६.७५ टक्के ते ७ टक्क्यांपर्यंत आहेत.

कोण सुरू करू शकतं खाते

आरडी खाते सुरू करण्यासाठी तुम्हाला भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. जर तुमचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे तर तुम्ही अभिभावकासह खाते खोलू शकता.

किती रूपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक

पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही कमीत कमी १०० रूपये प्रती महिना बचत करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही कितीही पैसे टाकू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -