Saturday, June 1, 2024
Homeमहत्वाची बातमीआयएनएस सुरत, उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण

आयएनएस सुरत, उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण

मुंबई (प्रतिनिधी) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयएनएस ‘सुरत’ आणि आयएनएस ‘उदयगिरी’ या युद्धनौकांचे आज जलावतरण करण्यात आले. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या दोन युद्धनौकांचे जलावतरण माजगाव डॉक येथे पार पडले. यावेळी नेवल चीफ हरि कुमार, व्हाइस अॅडमिरल चीफ ए व्ही. सिंग, खासदार अरविंद सावंत, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशीष शेलार, आमदार यामिनी जाधव आणि शिवसेना नेते सचिन अहिर हे उपस्थित होते.

या दोन्ही युद्धनौकांची भर पडल्यामुळे देशाची समुद्री क्षमता वाढली आहे. स्वदेशी बनावटीच्या भारतीय नौदलाच्या ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ या दोन युद्धनौका मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे बांधण्यात आल्या. भारतीय नौदलाची १५ बी श्रेणीची ‘सुरत’ ही युद्धनौका प्रगत श्रेणीची असून ती मार्गदर्शित क्षेपणास्त्रे नष्ट करण्यास सक्षम आहे. दुसरी ‘१७ ए’ फ्रिगेट्स प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या युद्धनौकेचे नाव ‘उदयगिरी’ या आंध्र प्रदेशातील रेंजवर ठेवण्यात आले आहे. ही युद्धनौका सर्वोत्तम उपकरणे, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे.पी ‘१७ ए’ प्रकल्पांतर्गत एकूण सात जहाजांचे बांधकाम सुरू आहे. गुजरात राज्याची व्यावसायिक राजधानी आणि मुंबईनंतर पश्चिम भारतातील दुसरे सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र म्हणून ‘सुरत’हे नाव देण्यात आले आहे, तर आंध्र प्रदेशातील एका पर्वतराजीच्या नावावरून ‘उदयगिरी’ हे नाव देण्यात आले आहे.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्याचे संरक्षण मंत्री यांनी भारताचा प्राचीन नौदलाचा इतिहासही उलगडला. वास्को-द-गामा या खलाशांनी लावलेल्या शोधात त्याचे मार्गदर्शन काझी मलाम यांनी केले होते, हे त्यांनी आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कानोजी आंग्रे यांनी तयार केले. कान्होजी आंग्रे हे चाणाक्ष ॲडमिरल होते. येणाऱ्या काळात भारत केवळ देशासाठीच नाही तर जगासाठी जहाजबांधणी करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -