Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडामहिला अंडर-१७ फुटबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

महिला अंडर-१७ फुटबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला अंडर-१७ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेकरिता २१ सदस्यीय भारतीय संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. ११ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून भारताकडे स्पर्धेचे यजमानपद आहे. या स्पर्धेत भारत ‘अ’ गटात असून त्यांच्या गटात यूएसए, मोरोक्को आणि ब्राझीलचा समावेश करण्यात आला आहे. भारत या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना ११ ऑक्टोबरला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १४ आणि १७ ऑक्टोबरला अनुक्रमे मोरोक्को आणि ब्राझीलविरुद्ध मैदानात उतरेल. भारतीय संघाचे सर्व सामने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर पार पडणार आहेत.

भारतीय महिला अंडर-१७ फुटबॉल संघाची घोषणा करताना थॉमस डेनरबी म्हणाले की, “ही प्रत्येकासाठी नवीन परिस्थिती आहे. भारताने यापूर्वी कधीही विश्वचषक खेळलेला नाही. हा खेळाचा पूर्णपणे वेगळा स्तर असेल. या स्पर्धेतील सामने ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, मडगाव (गोवा) आणि नवी मुंबई येथे खेळले जाणार आहेत. “जेव्हा तुम्ही मैदानात असता, तेव्हा सर्व काही मागे राहते आणि तुम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावे लागते. भारतीय संघातील मुलींनीही हेच करायला हवे. आम्ही विजयाचे दावेदार म्हणून स्पर्धेत जात नाही. पण मला विश्वास आहे की, प्रतिस्पर्धी संघांवर दबाव असेल.”

गोलकीपर म्हणून मोनालिसा देवी मोइरंगथम, मेलोडी चानू कीशम, अंजलि मुंडा; डिफेंडर म्हणून अस्तम उरांव, काजल, नकेता, पूर्णिमा कुमारी, वार्शिका, शिल्की देवी हेमम; मिडफील्डरसाठी बबीना देवी लिशम, नीतू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंह; फॉरवर्ड खेळाडू म्हणून अनीता कुमारी, लिंडा कॉम सर्टो, नेहा, रेजिया देवी लैशराम, शेलिया देवी लोकतोंगबम, काजोल ह्यूबर्ट डिसूजा, लावण्या उपाध्याय, सुधा अंकिता टिर्की यांचा २१ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -