Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीInternational Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या खलाशांनी केली योगासने

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या खलाशांनी केली योगासने

मुंबई : दरवर्षी २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ (International Yoga Day) साजरा केला जातो. याच योगा दिनाच्या निमित्ताने काल भारतीय नौदलाच्या खलाशांनी (Indian navy Sailors) मुंबईतील काही प्रतिष्ठित ठिकाणी योगासने केली. तसेच आयएनएस विक्रमादित्यच्या (INS Vikramaditya) धावपट्टीवर आणि आयएनएस दीपकवरही योगाभ्यास केला. त्याचीच ही काही सुंदर छायाचित्रे…

मुंबईतल्या प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलजवळ (Taj Mahal Palace Hotel) भारतीय नौदलाचे खलाशी योगा करताना.

चर्चगेटमधील काला घोडाजवळ योगासने करताना.

चर्चगेटमधील फ्लोरा फाऊंटनजवळही (Flora Fountain) योगासने करण्यात आली.

एशियाटीक लायब्ररीजवळ खलाशांनी एक पद प्रणामासन (Eka pada pranamasana) करत फोटोसाठी छान पोज दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाबाहेरही (BMC Office) भारतीय नौदलाचे खलाशी ध्यानधारणेसाठी बसले होते.

यानंतर आयएनएस विक्रमादित्यच्या (INS Vikramaditya) धावपट्टीवर आणि आयएनएस दीपकवरही (INS Deepak) भारतीय नौदलाचे खलाशी योगाभ्यास करतानाची काही छायाचित्रे…

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या अनेक नौदल जहाजांनी ऑन-बोर्ड योगा (On-Board yoga) आणि माइंडफुलनेस सत्र (Mindfulness sessions) आयोजित केली.

भारतीय नौदलाचे खलाशी नौदलाच्या जहाजावर योगाभ्यास करताना…

आयएनएस शिवालिकच्या (INS Shivalik) डेकवरही खलाशांनी योगासन केले.

योगसाधनेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच ध्यानधारणा (Meditation) करताना भारतीय नौदलाचे खलाशी.

नौदलाच्या जवानांनी आयएनएस दीपकवर योगाभ्यास केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -