Monday, May 20, 2024
Homeक्रीडाIndia vs England: टीम इंडियाने ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा केली अशी कामगिरी

India vs England: टीम इंडियाने ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा केली अशी कामगिरी

राजकोट: भारताने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवला. सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सचा संघ चौथ्या दिवशी १२२ धावांवर ऑलआऊट झाला. कसोटी इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येने जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. याआधी त्यांनी डिसेंबर २०२१मध्ये न्यूझीलंडला वानखेडे कसोटी सामन्यात ३७२ धावांनी हरवले होते.

पाहिले असता भारतीय संघाने पहिल्यांदा कसोटीच्या इतिहासात ४००हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघ १९३२ पासून कसोटी सामने खेळत आहे. मात्र इतका मोठा विजय याआधी कधीच मिळाला नव्हता. ९२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने हा विजय मिळवला.

भारताने आतापर्यंत ५७७ कसोटी सामने खेळले आहे त्यातील १७६ सामन्यात विजय मिळवला तर १७८मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर २२२ सामने अनिर्णीत राहिले. भारताचा एक सामना बरोबरीत सुटला.

भारताचा धावांनी मोठा विजय

४३४ विरुद्ध इंग्लंड राजकोट २०२४
३७२ विरुद्ध न्यूझीलंड मुंबई २०२१
३३७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका दिल्ली २०१५
३२१ विरुद्ध न्यूझीलंड इंदौर २०१६
३२० विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली २००८

इंग्लंडचा धावसंख्येने मोठा पराभव

५६२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया द ओव्हल १९३४
४३४ विरुद्ध भारत राजकोट २०२४
४२५ विरुद्ध वेस्ट इंडिज मँचेस्टर १९७६
४०९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स १९४८

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -