Monday, June 3, 2024
Homeदेशचंदीगढ महापौर निवडणुकीचे समीकरण बदलले, न्यायालयाच्या सुनावणीआधीच महापौरांचा राजीनामा

चंदीगढ महापौर निवडणुकीचे समीकरण बदलले, न्यायालयाच्या सुनावणीआधीच महापौरांचा राजीनामा

चंदीगढ: चंदीगढमधील महापौर निवडणुकीत वेगळेच वळण पाहायला मिळत आहे. चंदीगढमधील महापौर निवडणुकीबाबत आरोप करत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर फसवणूक करत निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सोमवारी सुनावणी होत आहे. मात्र या सुनावणीआधीच चंदीगढच्या नवनियुक्त महापौर मनोज सोनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सोबतच आपचे तीन नगरसेवर नेहा मुसावट, गुरचरण काला आणि पूनम देवी यांनी पक्ष बदलल्याने चंदीगड महापौर निवडणुकीत संपूर्ण समीकरण बदलले आहे. आम आदमी पक्षाचे हे तीन नगरसेवक रविवारी भाजपमध्ये सामील झाले. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी माजी प्रदेश अध्यक्ष अरूण सूद यांच्यासोबत त्यांचे पक्षात स्वागत केले.

काय आहे समीकरण?

आपच्या तीन नगरसेवकांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या १७ झाली आहे. त्यांच्याकडे एक खासदार मतही आहे. याशशिवाय नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव नगरसेवकानेही भाजपला समर्थन दिले होते. म्हणजेच आता भाजपकडे एकूण १९ मते झाली आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

तीन नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या मतांची संख्या २० वरून घटून १७ झाली आहे. यात काँग्रेसचे ७ आणि आपचे १० नगरसेवक सामील आहेत. चंदीगड नगर पालिकेत एकूण ३५ नगरसेवक आहेत. तर एका खासदाराचे मत मिळून ३६ मते टाकली डातात. यानुसार बहुमताचा आकडा १९ असतो. तर भाजपकडे आता २० मते झाली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -