Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीINDIA Alliance Meeting : शेवटी घमंडियांची बैठक रद्दच झाली!

INDIA Alliance Meeting : शेवटी घमंडियांची बैठक रद्दच झाली!

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक (INDIA Alliance Meeting) बोलावली होती. पण या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार नसल्याचे समजले. त्यामुळे इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे दिसून आले. अखेर उद्या होणारी बैठक मिचाँग चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. पण महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती हेच बैठक रद्द होण्यामागील मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आजारी असल्याने बैठकीला येऊ शकणार नसल्याचे म्हटले होते. शिवाय अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज असल्याने तेही येणार नाहीत, असं राऊत म्हणाले. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना या बैठकीबद्दल माहितच नव्हतं, असं त्या म्हणाल्या. थोडक्यात, इंडिया आघाडीतील संवाद बिघडला आहे, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतलं नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन (Stalin) यांनीही मिचाँग चक्रीवादळामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.

बुधवारी होणाऱ्या बैठकीला जरी मोठे नेते उपस्थित राहू शकणार नसले तरीही त्या ठिकाणी आता एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. तसेच उद्या होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -