Monday, May 13, 2024
Homeक्रीडाIND vs ENG: विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जायसवालने केले हे जबरदस्त...

IND vs ENG: विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जायसवालने केले हे जबरदस्त रेकॉर्ड

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या ६ बाद ३३६ धावा झाल्या आहेत. विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जायसवालने जबरदस्त खेळी केली.

एका बाजूने भारताचे फलंदाज बाद होत असताना यशस्वी जायसवालने दुसरी बाजू लावून धरली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी जायसवाल २५७ चेंडूत १७९ धावा केल्या. आतापर्यंत या खेळाडूने आपल्या डावात १७ चौकार आणि ५ षटकार ठोकले. पहिल्या दिवशी यशस्वी जायसवालने जबरदस्त रेकॉर्ड्स आपल्या नावे केले.

भारतासाठी कसोटीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग अव्वल स्थानावर आहे. वीरेंद्र सेहवाग २००४मध्ये मुल्तान कसोटीच्या पहिल्या दिवशी २२८ धावा केल्या होत्या. तर आज यशस्वी जायसवालने १७९ धावा केल्या. भारतासाठी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जायसवाल सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

वीरेंद्र सेहवागने मुल्तान कसोटीच्या आधी मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी १९५ धवा केल्या होत्या. यानंतर वसीम जाफर दुसऱ्या स्थानावर आहे. वसीम जाफरने पाकिस्तानविरुद्ध २००७मध्ये कोलकातामध्ये १९२ धावा केल्या होत्या. शिखर धवन १९० धावांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग १८० धावांसह पाचव्या स्थानावर आहे. यानंतर सहाव्या स्थानावर यशस्वी जायसवाल आहे.

इंग्लंडविरुद्ध १ दिवसांत सर्वाधिक धावा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या १ दिवसांत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत यशस्वी जायसवाल तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यात करूण नायर अव्वल स्थानावर आहे. २०१६मध्ये चेन्नई कसोटीत करूण नायरने इंग्लंडविरुद्ध २३२ धावा केल्या होत्या. सुनील गावस्कर आणि यशस्वी जायसवालने १७९-१७९ धावा केल्या आहेत.

यशस्वी जायसवालच्या कसोटी करिअरवर नजर टाकल्यास या खेळाडूने ६ सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यशस्वी जायसवालने कसोटीत ६५.५६च्या सरासरीने ५९० धावा केल्या आहेत. यात २ शतकांव्यतिरिक्त २ अर्धशतकांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -