Monday, May 20, 2024
Homeक्रीडाIND vs ENG: दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला डबल झटका

IND vs ENG: दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला डबल झटका

मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, हैदराबादमध्ये पराभवानंतर टीम इंडियाला डबल झटका बसला आहे. विशाखापट्टणम येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाले आहे. जडेजाला हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. तर केएल राहुलच्या उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये दुखत होते. दरम्यान, बीसीसीआयच्या मेडिकल टीम दोन्ही खेळाडूंवर नजर ठेवून आहे.

 

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. तर आवेश खान आपल्या रणजी टीम मध्य प्रदेशसोबत राहणार आहे.

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया – रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत(विकेटकीपर), ध्रुव जरेल(विकेटकीपर), रवींचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -