Monday, May 20, 2024
Homeक्रीडाIND Vs ENG: टीम इंडियाला मोठा झटका, सर्व ५ कसोटी सामन्यातून बाहेर...

IND Vs ENG: टीम इंडियाला मोठा झटका, सर्व ५ कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकते मोहम्मद शमी

मुंबई: इंग्लंडविरूद्ध २५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीमचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सर्व ५ कसोटीतून बाहेर होऊ शकतो. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे मोहम्मद शमीला पहिल्या दोन कसोटी सामन्यात संघात स्थान मिळालेले नाही.

अखेरच्या तीन कसोटीत शमीच्या पुनरागमनची आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र शमीची दुखापत अधिक गंभीर असल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर गेल्याचे दिसत आहे. इतकंच नव्हे तर शमीला चांगल्या उपचारासाठी लंडनला पाठवले जाऊ शकते.

मोहम्मद शमीने विश्वचषकातील ७ सामने खेळताना सर्वाधिक २४ विकेट मिळवल्या होत्या. मात्र विश्वचषकानंतरपासूनच शमीच्या टाचेची दुखापत सुरू झाली आणि तो संघातून बाहेर गेला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार मोहम्मद शमीला तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की शमी नॅशनल क्रिकेट अकादमीचे स्पोर्ट्स सायन्स हेड नितीन पटेल यांच्यासोबत लंडनला रवाना होणार आहेत.

सूर्या आणि पंतवरही परदेशात उपचार

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की शमीने एनसीएमध्ये पटेलसमोर गोलंदाजीचा सराव केला. यानंतर हे समोर आले की शमीला अद्यापही उपचाराची गरज आहे. आता शमीला लंडन पाठवण्याची तयारी सुरू आहे. आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरच बीसीसीआयकडून शमीच्या फिटनेसबाबत अपडेट दिले जाऊ शकते.

याआधी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला उपचारासाठी जर्मनीला पाठवले होते. जर्मनीमध्ये सूर्यकुमार यादववर शस्त्रक्रिया झाली होती. आयपीएलमध्ये सूर्यकुमारचे पुनरागमन शक्य आहे. दरम्यान सूर्यकुमार यादव सुरूवातीच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -