Friday, May 17, 2024
HomeदेशPM Modi : पंतप्रधानांच्या हस्ते ग्रीनफिल्ड विमानतळाचे लोकार्पण

PM Modi : पंतप्रधानांच्या हस्ते ग्रीनफिल्ड विमानतळाचे लोकार्पण

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील इटानगर इथल्या पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे (Greenfield Airport) आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकार्पण केले. (Inauguration of Greenfield Airport by Prime Minister Modi) यावेळी पंतप्रधानांनी ६०० मेगावॅट क्षमतेचे कामेंग जलविद्युत केंद्राचे देखील लोकार्पण केले. पंतप्रधानांनी २०१९ मध्ये या विमानतळाचा पायाभरणी केली होती. या विमानतळाच्या संपूर्ण कामाला ६४५ कोटी रुपये खर्च आला.

यावेळी पंतप्रधान (PM Modi) म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारताचा ईशान्य भाग अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिला. अटलजींचे सरकार आल्यावर पहिल्यांदाच या ठिकाणी बदल करण्याचा प्रयत्न झाला. ईशान्येच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय असणारे हे पहिले सरकार होते. तुम्हाला माहिती आहे का की, आम्ही एक अशी कार्यसंस्कृती आणली आहे, ज्याच्या माध्यमातून हे सरकार ज्या प्रकल्पांची पायाभरणी करते, त्यांचे उद्घाटनही करते. पूर्वीच्या सरकारप्रमाणे ‘अडकले, लटकले, भटकले’चे युग गेले. दिशाभूल करण्याची वेळ गेली असे पंतप्रधानांनी सांगितले.

मोदी (PM Modi) पुढे म्हणाले की, आमचे स्वप्न फक्त भारतमातेसाठी आहे, अरुणाचलच्या या यशाबद्दल संपूर्ण ईशान्येचे अभिनंदन, पूर्वी लोक इथे फक्त निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता इथले आता वातावरण बदलत आहे. आता केवळ प्रयत्नच नाही तर विकासही दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अग्रलेख : भारत जोडो नव्हे, ‘तोडो’ यात्रा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -