Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीहॉलिवूड अभिनेत्री बेट्टी व्हाईट यांचे निधन

हॉलिवूड अभिनेत्री बेट्टी व्हाईट यांचे निधन

नवी दिल्ली : हॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री बेट्टी व्हाईट यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ९९ होते. बेट्टी व्हाईट यांनी टीव्हीवरील ”द गोल्डन गर्ल्स” या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. आणि या शोमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. ”फर्स्ट लेडी ऑफ टेलिव्हिजन” म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बेट्टी व्हाईट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बेट्टी व्हाईट यांनी लोकांचे मनोरंजन करण्याचे काम केले. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम केले. त्या प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात राहतील, असे बायडन यांनी म्हटले आहे. बेट्टी व्हाईट यांना 8 अॅमी पुरस्कार, 1 ग्रॅमी पुरस्कार आणि 3 स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -