Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीBandra Worli Sea Link : सातारा, पुणेसह मुंबईकरांच्याही खिशाला फटका! वांद्रे-वरळी सीलिंकवर...

Bandra Worli Sea Link : सातारा, पुणेसह मुंबईकरांच्याही खिशाला फटका! वांद्रे-वरळी सीलिंकवर टोलवाढ

किती टक्क्यांनी झाली वाढ? 

मुंबई : पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक प्रवास महागणार असून १ एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पण यासोबतच आता मुंबईकरांच्याही खिशाला भार सोसावा लागणार आहे. याचं कारण म्हणजे वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून टोलमध्ये वाढ (Toll Hike) करण्यात आली आहे. ही टोल वाढ १८ टक्के एवढी करण्यात आली आहे.

नेमकी किती झाली वाढ?

वांद्रे-वरळी सी लिंकवरुन प्रवास करणं आता महाग होणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिणेकडील भागातील जोडण्यासाठी हा सेतू महत्त्वाचा आहे. या टोल वाढीमुळे सध्याच्या कार आणि जीपचे टोल ८५ रुपयावरून १०० रुपयावर जाणार आहेत. तसेच मिनीबस, टॅम्पो आणि इतर वाहनांमधील प्रवाशांना १३० रुपयावरुन १६० रुपये आकारले जाणार आहेत. तर एकेरी प्रवासासाठी १७५ रुपये ऐवजी दोन एक्सेल ट्रकसाठी २१० रुपये आकारले जाणार आहेत.

१ एप्रिल २०२४ पासून तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना

दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची तात्काळ अंमलबजावणी १ एप्रिल २०२४ पासून होणार असल्याची माहिती देखील मंडळाने दिली आहे. माहीम दादर प्रभादेवी वरळी भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम उपनगरातील वाहनधारक या सागरी सेतूचा उपयोग करत असतात. तर याच सागरी सेतुला आता धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सागरी किनारा मार्ग सुद्धा जोडण्यात येत आहे. हा सागरी किनारा रस्ता सिलिंगला जोडल्यास यावरुन वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -