Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीPakistan Inflation: पाकिस्तानात महागाईने लोकांचे हाल, ३ हजारांपेक्षा अधिक रूपयांना मिळतोय गॅस...

Pakistan Inflation: पाकिस्तानात महागाईने लोकांचे हाल, ३ हजारांपेक्षा अधिक रूपयांना मिळतोय गॅस सिलेंडर

इस्लामाबाद: भारताचा शेजारील देश पाकिस्तानात(pakistan) समस्या काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आर्थिक संकटांनी पाकिस्तानने कंबरडे मोडले आहे. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात पेट्रोलच्या तसेच डिझेलच्या किंमतीनी जबरदस्त उसळी घेतली होती. तसेच देशाचा महागमाई दर ३१.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सप्टेंबरमध्ये वाढली महागमाई

ऑगस्टमध्ये पाकिस्तानात महागाईचा दर २७.४० टक्के इतका होता. सप्टेंबरमध्ये महागाई दरात मोठी वाढ झाली आहे.सप्टेंबरमध्ये वाढलेल्या महागाईचे मुख्य कारण पेट्रोल आणि डिझेल तसेच एलपीजीच्या दरात झालेली वाढ आहे.

३० ऑक्टोबरला पाकिस्तानची सेंट्रल बैठक होणार आहे. यात व्याजदरांबाबत समीक्षा केली जाणार आहे. या बैठकीत महागाईला आळा घालण्यासाठी काही पावले उचलली जाऊ शकतात.

जनतेचे महागाईने हाल

पाकिस्तानच्या कार्यवाहक सरकारने जुलैपासून सुरू झालेले आयएमएफचे बेलआऊट पॅकेज मिळवण्यासाठी पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात तसेच एलपीजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर देशात परिवहनच्या किंमतीत दरवर्षाच्या हिशेबाने ३१.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पाकिस्तान सरकारने १ सप्टेंबरला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या ऑईल अँड गॅस रेग्युलेटरी ऑथॉरिटीने एलपीजीच्या दरात २४६.१६ रूपयांची वाढ केली होती. त्यानंतर एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ३०७९.६४ रूपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -