केरळमध्ये पावसाचा हाहाकार

Share

तिरुवनंतपूरम (वृत्तसंस्था) : केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. कोट्टायमला पावसाचा अधिक तडाखा बसला आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय पावसामुळे पठानमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.

पावसाचा तडाखा बसलेल्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहनं वाहून गेली आहेत. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. ‘मुसळधार पाऊस आणि भूस्खलना घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जखमी आणि फटका बसलेल्या नागरकांना मदत करण्यासाठी काम सुरू आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो’, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. केरळमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांसाठी पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानी झाल्याचे पाहून दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी सांत्वन केले आहे. लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार केरळ सरकारला सर्व शक्य मदत करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

तिरुवनंतपूरम, कोल्लम, पठानमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड यासह ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Recent Posts

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात ५८ जागांसाठी आज मतदान

मनोज तिवारी, कन्हैया कुमार, मनेका गांधी रिंगणात नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी…

3 hours ago

IPL 2024: सनरायजर्स हैदराबादचा आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

मुंबई: आयपीएल २०२४च्या फायनलचे दोन संघ अखेर ठरले आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान…

7 hours ago

झाडू पार्टी ड्रग्सची होलसेलर! पंतप्रधान मोदी यांचा ‘आप’ वर निशाणा

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मालकाचे आदेश घेण्यासाठी तिहार जेलमध्ये जावे लागते जालंधर(वृत्तसंस्था): ज्यांनी एवढा मोठा दारू घोटाळा…

8 hours ago

Porshe car accident: पुणे अपघात प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती पुणे (प्रतिनिधी): पुणे हिट अँन्ड रन…

8 hours ago

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी ICC कडून कमेंट्री पॅनेलची घोषणा, कार्तिकची एंट्री

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ची सुरूवात होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. आगामी वर्ल्डकप १…

10 hours ago

Jio फ्रीमध्ये देत आहे अनेक OTT प्लॅटफॉर्म, सोबतच मिळवा कॉल आणि २ जीबी डेटा

मुंबई: आजच्या काळात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत ज्यांचे सबस्क्रिप्शन प्लान वेगवेगळे घ्यावे लागता. आज…

11 hours ago