Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीराज्याला मोठा कोरोना दिलासा

राज्याला मोठा कोरोना दिलासा

दिवसभरात ८०९ नवे रुग्ण; १० बाधितांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याला कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला असून सोमवारी दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या खाली घसरली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून दिवसभरातील मृत्यूसंख्या देखील कमी झाल्याने एक आशादायक चित्र निर्माण झाले आहे. शिवाय, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही १५ हजारांवर घसरली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात राज्यात ८०९ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी ही संख्या १ हजार १७२ इतकी होती. तर दिवसभरात एकूण १ हजार ९०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ३९९ इतकी होती. तर, दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी ही संख्या २० इतकी होती.

राज्यात दिवसभरात झालेल्या १० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ५२ हजार ४८६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के इतके आहे. राज्यासाठी कोरोनाबाबत ही दिलासादायक बाब आहे.

मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ५५२ इतकी आहे. रविवारी ही संख्या १६ हजार ६५८ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबई जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत हा आकडा ४ हजार ५०३ इतका आहे. तर पुणे जिल्ह्यात हा आकडा ३ हजार २१० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या १ हजार ६१८, तर अहमदनगरमध्ये ही संख्या १ हजार ८७१ इतकी आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ४७० अशी आहे. तसेच, सांगलीत एकूण ३८९ इतकी आहे. तर, सोलापुरात ही संख्या ३१८ इतकी आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५५७, रत्नागिरीत १४८ इतकी कमी झाली आहे, तर सिंधुदुर्गात ती ३२६ इतकी आहे. या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४५९, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६६ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १७ वर आली आहे. तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी, म्हणजेच प्रत्येकी एक सक्रिय
रुग्ण आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी २७ लाख ५२ हजार ६८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ११ हजार ८८७ (१०.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ४३२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. धारावी, वरळी कोळीवाडी येथे सध्या दिलासादायक चित्र आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -