Friday, May 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाचे आज गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन

पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाचे आज गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी (traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या चांदणी चौक उड्डाणपूलाचे (chandani chowk flyover) अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्घाटन केले जात आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis), आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. या उड्डाणपूलाच्या प्रकल्पाचा नारळ पाच वर्षांपूर्वी फोडण्यात आला होता.

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना राज्य सरकार आणि पुणे नगर विकास यांच्या योगदानातून हा उड्डाणपूल बनवण्यात आला आहे. चांदणी चौक हे मुख्य जंक्शन आहे जे बावधन, एनडीए, पाषाण, मुळशी रोड, मुंबई-बंगळुरू बायपासला जोडते. येथील वाहतूक कोंडी लक्षात घेता या उड्डाणपूलाची उभारणी करण्यात आली.

य़ा नव्या उड्डाणपूलामुळे येथून आता दिवसाला दीड लाख वाहने धावू शकतील असा अंदाज आहे. याआधी ही संख्या ३० ते ३५ हजार इतकी होती. फेब्रुवारी २०१९मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. या उड्डाणपूलामुळे येथीील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरून प्रवास करण्याची गरज नाही. या रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल.

वाहतूक कोंडीतून सुटका

पुणे शहरातील या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असे. या वाहतूक कोंडीचा विचार करता हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. यामुळे पश्चिम भागामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -