Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीअन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

अन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

नाशिक : ग्राहकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत धडक मोहिम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून दि. १७ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे पथक संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या अनुषंगे पथकाने अशोक जीतलाल यादव, मे. तिस्ता क्रोप केअर प्रा.लि., मोरे मळा, लक्ष्मण टाउनशिप, अंबड लिंक रोड, सिडको, नाशिक या उत्पादक कारखान्याची तपासणी केली असता तेथे रिफाईन्ड पामोलिन ऑईल, unknown white solid flakes (adulterant) चा वापर करून पनीर अन्नपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथून पनीर, रिफाईन्ड पामोलिन ऑईल, unknown white solid flakes (adulterant) व मिक्स मिल्क या अन्नपदार्थाचे नमुने घेवून पनीरचा 194 किलो; किंमत रु.46,560/-, रिफाईन्ड पामोलिन ऑईलचा 88 किलो, किंमत रु.14,960/-, व मिक्स मिल्कचा 1498 लिटर, किंमत रु.44,940/- असा एकूण किंमत रु.1,06,460/- किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून व्यापक जनहिताच्या दृष्टिले पनीर, व मिक्स मिल्काचा साठा नष्ट करण्यात आलेला आहे तर रिफाईन्ड पामोलिन ऑईलचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेले चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल.

सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो.सानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी यो. रो. देशमुख, गोपाल कासार, नमुना सहायक विजय पगारे यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी भेसळयुक्त पनीरचा वापर अन्नपदार्थ बनविणेसाठी करु नये. नागरिकांना अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -