Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : डोंबिवली स्फोटप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : डोंबिवली स्फोटप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

स्फोटात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू व ३५ ते ४० जण जखमी असल्याची माहिती

ठाणे : डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) परिसरात आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास फेज-२ मधील अमोधन केमिकल कंपनीत भीषण स्फोट (Blast) झाल्याची दुर्घटना घडली. अजूनही कंपनीत ठेवलेल्या केमिकल ड्रमचे स्फोट होत आहेत, अशी माहिती आहे. कंपनीतील बॉयलरमध्ये सर्वप्रथम स्फोट झाल्यामुळे आगीसह धुराचे लोट संपूर्ण डोंबिवली परिसरात पसरले. स्फोटात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू व ३५ ते ४० जण जखमी असल्याची माहिती आहे. मात्र, यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटले आहे की, डोंबिवली एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. आठ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमूला पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

दरम्यान, या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आल्याप्रमाणे पळत होते. आजूबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत, तसेच मोठी मनुष्यहानी झाली असावी, असा अंदाज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -