Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेउल्हासनगर येथे आमदाराकडून शिवसेना कल्याण शहर प्रमुखावर गोळीबार

उल्हासनगर येथे आमदाराकडून शिवसेना कल्याण शहर प्रमुखावर गोळीबार

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर चक्क पोलिसांसमोरच गोळीबार केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, एका व्हायरल व्हिडीओमध्ये गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज दिसून येत आहे. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकच धावपळ उडाली झाली. या घटनेमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महेश गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये वाद विवाद सुरू आहेत. मग ते जमिनीचे वाद असतील, राजकीय वाद असतील, असे हे वाद सुरू आहेत.

तीन ते चार महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या एका ग्रुपमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांनी एकमेकांना विकास कामावरून आव्हान केले होते. एकमेकांविरुद्ध सोशल मीडियात टीका टिपणी केली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांनी सोशल मीडियामध्ये एकमेकांना चॅलेंज केले होते. तुम्ही केलेली विकासकामे जनतेसमोर मांडा, असे आव्हान दिले होते. हा वाद एवढा चिघळला आणि दोघांनी एकमेकांना आव्हान दिल्यामुळे पोलिसांनी वेळीच महेश गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयामधूनच ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील (Kalyan) द्वारली गावातील जाधव कुटुंबांचीची जमीन गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी विकत घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांच्यासोबत काही महिला या जमिनीच्या वादातून वाद-विवाद घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे काल त्या जमिनीवर कंपाऊंडचे काम सुरू असल्याने पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड त्या जागेवर गेले. जागेवर सुरू असलेले कंपाउंडचे काम पाडण्यास त्यांनी सुरुवात केली. हा वाद त्या ठिकाणी सुरू असताना आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव यांनी वडील आमदार गणपत गायकवाड यांना फोनद्वारे संबंधित घटनेची माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -