Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीआता माझी सटकली! मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाने पोलीसच वैतागले; मौलवी आणि मुतवल्लीविरोधात गुन्हा...

आता माझी सटकली! मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाने पोलीसच वैतागले; मौलवी आणि मुतवल्लीविरोधात गुन्हा दाखल

सीतापूर : मशीदमधून (Mosque) लाऊडस्पीकरद्वारे (Loud Speaker) मोठ्या आवाजात अजान देण्यात येत होती ती मशीद पोलीस लाईनजवळ आहे. आवाज कमी करण्यासाठी पोलिसांनी मौलवी आणि मुतवल्लींना अनेक वेळा समजावून सांगितले. पण त्यांना काही फरक पडला नाही. अखेर संतापलेल्या उत्तर प्रदेश मधील सीतापूर पोलिसांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात मशिदीवरील भोंग्याचा आवाज वाढवल्यामुळे मशिदीतील मौलवी आणि मुतवल्ली यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

मौलवीचे नाव अब्दुल्ला, तर मुतवल्लीचे नाव बब्बू खान आहे. यासह पोलिसांनी ३५६ ठिकाणच्या भोंग्यांचा आवाज कमी करायला लावला. तर सांगूनही न ऐकणा-या १२ मशिदीमधील लाउडस्पीकर हटवले आहेत.

हे प्रकरण सीतापूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे स्वतः पोलीस आहेत. चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक अश्मित भारती यांनी त्यांच्याच पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ३ डिसेंबर रोजी ते त्यांच्या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, पोलीस लाईनशेजारील मशिदीत मोठ्या आवाजात भोंगे वाजवले जात असल्याचे समोर आले. त्यामुळे मशिदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे अश्मित भारती यांनी सांगितले.

पोलीस लाईनजवळ बांधलेल्या या मशिदीत सीतापूर येथील रहिवासी दीन मोहम्मद यांचा मुलगा अब्दुल्ला याला मौलवी तर त्याच जिल्ह्यातील रहिवासी सरताज यांचा मुलगा बाबू खान याची मुतवल्ली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपनिरीक्षक अश्मित यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनाही माईकचा आवाज मानकांनुसार ठेवण्यासाठी यापूर्वी अनेकदा समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्या दोघांनाही काहीही फरक पडला नाही. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर आयपीसीच्या कलम १८८ सोबत ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम २००० च्या कलम ५/६ नुसार कारवाई केली. अब्दुल्ला आणि बब्बू खान यांच्यावरील ही कारवाई उत्तर प्रदेश सरकारच्या नियमांचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन असल्याचे सांगत पोलिसांनी ही कारवाई केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -