Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाइंग्लंडचा पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय

इंग्लंडचा पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडने ५ विकेट्सनी जिंकत इतिहास रचला आहे. दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचे दाखवत अवघ्या १३७ धावांमध्ये पाकिस्तानला रोखले. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे १३८ धावाचे आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झाले. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद ५२ धावा करत ५ गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला.

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय बोलर्सनी अगदी योग्य असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या १३७ धावांमध्ये पाकिस्तानला रोखले. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण १५ धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही ८ धावांवर बाद झाला.

कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण ३२ धावा करुन तोही तंबूत परतला. इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत २८ चेंडूत ३८ धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने १३७ धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने ४ ओव्हरमध्ये केवळ १२ धावा देत ३ महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनं एक महत्त्वाची विकेट घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -