Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीEknath Khadse : भाजपा माझं घर; पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपामध्ये!

Eknath Khadse : भाजपा माझं घर; पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपामध्ये!

भाजपात घरवापसी करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांचं स्पष्टीकरण

कधी करणार पक्षप्रवेश? स्वतः सांगितला मुहूर्त…

जळगाव : पूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले मात्र काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) राज्याच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. जळगाव (Jalgaon) मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीचा नेता म्हणून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची बाजू लावून धरली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही त्यांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) न जाता शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. शिवाय भाजपाच्या नेत्यांचीही एकनाथ खडसेंबाबत स्वागतार्ह भूमिका होती. या चर्चेवर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी शिक्कामोर्तब केले असून लकवरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

एकनाथ खडसे दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्याशी चर्चा करून आज त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, आपण लवकरच येत्या पंधरा दिवसात भाजप मध्ये प्रवेश करणार आहे. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले आहे.

‘भाजपा हे माझे घर आहे. पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपामध्ये राहिलो आहे. भाजपमध्ये माझं योगदान राहिलं आहे. चाळीस वर्षे मी भाजपामध्ये होतो. काही नाराजीमुळे मी भाजपामधून बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाल्याने मी पक्षात पुन्हा प्रवेश करत आहे’, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

शरद पवारांचा मी ऋणी

शरद पवार (Sharad Pawar) यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता जी परिस्थिती आहे ती मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितली. त्यांची अनुकूलता पाहून मी भाजपामधे जाण्याचा हा निर्णय घेतला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या घरवापसीमुळे जळगावात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे आता जळगाव लोकसभेची निवडणूक आणखी निकराची होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -