Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाधमकीला भीक घालत नाही : गौतम गंभीर

धमकीला भीक घालत नाही : गौतम गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे.

गौतम गंभीर यांना तीन धमकीचे मेल आले आहेत. या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, असे लिहिले आहे. तसेच, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांत आहेत, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे, असेही त्या मेलमध्ये लिहीले आहे. आता, गौतमनेही या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे म्हटले आहे.


गौतम गंभीरने आपण कुठल्याही धमकीला भीत नसून तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. मी माझे काम थांबवणार नाही, कार्यक्रमांमध्ये मी भाग घेतच राहिल, असे गंभीरने म्हटले आहे. तसेच, सध्या माझे लक्ष दिल्ली प्रीमीयर लीगवर आहे. युमना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या स्पर्धेच्या यशस्वीतेवर माझे लक्ष असल्याचेही गंभीरने म्हटले आहे. दरम्यान, गौतम गंभीर काश्मीरमधील शहिदांच्या कुटुंबीयांना सातत्याने मदत करत असतो. तसेच, येथील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही तो पार पाडतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -