Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही!

Devendra Fadnavis : सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही!

आमदार अपात्रतेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी लावलेल्या निकालानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray group) तोंडचे पाणी पळाले आहे. सरकार २०२३ मध्येच पडणार अशी भाषा करणारे या निकालामुळे चांगलेच आपटले आहेत. आताच्या सरकारचा सतत घटनाबाह्य असा उल्लेख करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी वारंवार सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. ‘सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही! सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणारच’, असं ते म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते. त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात म्हटले आहे की, सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही.

पुढे ते म्हणाले, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. आज विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला देत जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -