Sunday, June 16, 2024
Homeमहत्वाची बातमीDevendra Fadanvis : स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका!

Devendra Fadanvis : स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका!

पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांचं पालकांना आवाहन

आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कारवाईची दिली माहिती

पुणे : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी मुलगा वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) हा १७ वर्षांचा असून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. विशाल यांचे सरकारी यंत्रणेशी व अंडरवर्ल्डशी लागेबांधे आहेत, त्यामुळे मुलावर कठोर कारवाई झाली नाही आणि घटनेनंतर पाच तासांतच त्याला जामीन देण्यात आला, असा संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) कार्यक्षमतेवरही या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कारवाईची माहिती दिली तसेच पालकांना एक आवाहनही केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कलम ३०४ चा अतिशय स्पष्ट उल्लेख करत रिमांडचं अॅप्लिकेशन ज्युएनाईल जस्टीसकडे केलं होतं. यात स्पष्टपणे लिहिलं होतं की हा जो मुलगा आहे हा १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्यामुळे, निर्भयाकांडानंतर कायद्यात झालेल्या अमेंडमेंटनुसार १६ वर्षावरील जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. हा खटला ३०४ (अ) नाही तर ३०४ च आहे, त्यामुळे आरोपीला प्रौढ समजून खटला चालवण्यास परवानगी द्यावी, अशा प्रकारे पोलिसांनी प्रेस केलं होतं.

दुर्दैवाने ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डने त्याबाबत वेगळी भूमिका घेतली. आरोपीला प्रौढ म्हणून ट्रीट करण्यासाठी जो अर्ज करण्यात आला होता तो केवळ सीन आणि फाईल्ड केल्याने पोलिसांसाठीही हा धक्का ठरला. या गुन्ह्याचे सर्व पुरावे पोलिसांनी दिल्यानंतरही बोर्डाने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. याबाबत तात्काळ वरच्या कोर्टात अॅप्लिकेशन गेल्यानंतर कोर्टाने दखल घेतली. कोर्टाने सांगितलं याबाबत तुम्हाला पहिल्यांदा ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डाकडे जावं लागेल, कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिन्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे. त्यांनी जर रिन्यू केली नाही तर तुम्हाला आमच्याकडे येता येईल.

वरच्या कोर्टाच्या आदेशानुसार, ती ऑर्डर रिन्यू करण्यास गेली आहे. कदाचित आज किंवा उद्या ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डचं रिवीजनमधील ऑर्डर अपेक्षित आहे. मला वाटतं वरच्या कोर्टातील व्यूव्ह बघता, ते योग्य ऑर्डर देतील. पण त्यांनी जर दिली नाही तर पोलीस वरच्या कोर्टात पुन्हा जातील. पोलिसांनी ठरवलं आहे की अशाप्रकारे दारु पिऊन, विना नंबरची गाडी चालवत कुणालाही मारण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची भूमिका पोलिसांची आहे.

‘त्या’ सर्वांवर पोलिसांनी कारवाई केली

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. कारण कायद्यानुसार आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असूनही गाडी देणं हा गुन्हा आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ज्यांनी अंडर एज अर्थात अल्पवयीनांना दारु सर्व्ह केली, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. चार लोकांना अरेस्ट करण्यात आलं आहे. आजच कोर्टाने त्यांना चार दिवसांची रिमांड दिली आहे. त्याशिवाय पुढची कारवाई पोलीस करणार आहेत.

फडणवीसांचं पालकांना आवाहन

ज्युवेनाईल अॅक्ट अंतर्गत अल्पवयीन मुलाने चूक केली असली तरी पहिली कारवाई ही पालकांवर केली जाते, त्यामुळे मुलांच्या हाती स्टिअरिंग देण्याच्या आधी पालकांनी विचार करावा असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका असं आवाहन फडणवीसांनी राज्यातल्या पालकांना केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -