मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी…तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद….

Share

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी समुद्रात मनसोक्त डुंबत आनंद घेतला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर संपुर्ण तालुक्यावर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर तळपत्या सुर्याचे दर्शन होऊ लागले या तळपत्या उन्हात सुद्धा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला.

मुरुड-बीच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील रुपेरी वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर, घोडागाडी , बग्गी सवारी, डबल सीट सायकल पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटत होते.

बीचवर विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात. यामुळे मुरुडबीचला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

मुरुड बीचवर सुशोभीकरण करण्याचे काम सद्या जोरात सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक मुरूड बिचवर थांबतील, विनामूल्य पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड बांधण्यात येत आहेत बैठकीची व्यवस्था केली जात आहे. बाजूलाच विश्राम बाग आहे, या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटक मुरूड बीचकडे जास्तीत जास्त आकर्षित होत आहेत.

Tags: Murud beach

Recent Posts

परमछाया…

माेरपीस: पूजा काळे अश्मयुगीन किंवा त्याहीपेक्षा अतिप्राचीन काळापासून मनुष्य जन्माचं कोडं अघटित, अचंबित करणारं आहे.…

32 mins ago

कर्करोगाला हरवून ४०० कोटी रुपयांची कंपनी सुरू करणारी कनिका

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे वयाच्या २३ व्या वर्षी तिला कर्करोग झाला. मात्र तिने हिंमतीने…

47 mins ago

CSK vs RCB: प्लेऑफमध्ये बंगळुरु ‘रॉयल’ एंट्री, चेन्नईचा २७ धावांनी केला पराभव…

CSK vs RCB: आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आमने-सामने…

59 mins ago

मराठीचा हक्क

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर महाराष्ट्र ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार…

1 hour ago

मुंबईवर वर्चस्व कोणाचे?

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २० मे रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या…

1 hour ago

IPL 2024: विराट कोहलीचा रेकॉर्ड, क्रिस गेलशी केली बरोबरी

मुंबई: विराट कोहलीने चेन्नई सुपरकिंग्सविरोधात आयपीएल सामन्यात रेकॉर्ड्सची बरसात केली आहे. विराट कोहलीचे अर्धशतक तीन…

3 hours ago