Tuesday, May 21, 2024
Homeदेशइंडिया आघाडी कडून हिंदू धर्माचा सतत अपमान

इंडिया आघाडी कडून हिंदू धर्माचा सतत अपमान

पंतप्रधान मोदींचे काँग्रेस, डीएमकेवर टीकास्त्र

सेलम (वृत्तसंस्था): डीएमके आणि काँग्रेसची इंडिया आघाडी इतर कोणत्याही धर्माचा अपमान करत नाही. ते इतर कोणत्याही धर्माविरुद्ध एक शब्दही उच्चारत नाहीत, पण हिंदू धर्माला शिव्या देण्यात एक सेकंदही वाया घालवत नाहीत. ही आघाडी हिंदू धर्माचा सतत अपमान करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

तामिळनाडूतील सेलम येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डीएमकेवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधींनी ‘शक्ती’ वरून केलेल्या टीकेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, इंडिया आघाडी वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा अपमान करत आहे. काँग्रेस आणि डीएमके यांना हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय आहे. हिंदू धर्माविरुद्ध त्यांनी केलेले प्रत्येक विधान अतिशय विचारपूर्वक केले जाते.

इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांवर जोरदार निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे शास्त्र साक्ष देते की जे लोक शक्ती संपवण्याचा विचार करतात, त्यांचा विनाश होतो. १९ एप्रिल रोजी अशा धोकादायक विचारांना हरवण्याची सुरुवात पहिला माझा तामिळनाडू करेल. निवडणुकीचा प्रचार नुकताच सुरू झाला आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या सभेत इंडिया आघाडीच्या योजना उघड झाल्या आहेत. हिंदू धर्माची ज्या शक्तिवर आस्था आहे. त्या शक्तीचा विनाश करायचा असल्याचं ते म्हणत आहेत. हिंदू धर्मात शक्ती कशाला म्हणतात हे तमिळनाडूतील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. आता तामिळनाडूने ठरवले आहे की १९ एप्रिलला प्रत्येक मत भाजपा आणि एनडीएकडे जाईल. अबकी बार ४०० पार हे आता तामिळनाडूने ठरवले असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

देशातील महिला शक्तीच्या प्रत्येक समस्येसमोर मोदी ढाल बनून उभे आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. महिलांना धूरमुक्त जीवन देण्यासाठी आम्ही उज्ज्वला एलपीजी गॅस कनेक्शन दिले आहेत, मोफत वैद्यकीय उपचारांसाठी आयुष्मान योजना सुरू केली आहे. या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी नारीशक्ती असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -