‘छोटे उस्ताद’ पुन्हा भेटीला…

Share
  • ऐकलंत का!: दीपक परब

मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २’ या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. छोट्या पडद्यावरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २’ या गाण्याच्या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये ‘तू चाल पुढं… हे गाणं १० वर्षांचा संकल्प काळे गाताना दिसत आहे. संकल्प हा जालनाचा आहे. प्रोमोमध्ये पुढे, संकल्प हा सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्यासमोर गात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत हे ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’बाबत घोषणा करताना दिसतात. हा कार्यक्रम १० जूनपासून शनिवार ते रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या कार्यक्रमात कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार आहे? या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते की, सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत हे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत.

‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाची शुद्धी कदम ही विजेती ठरली होती. या कार्यक्रमात राजयोग धुरी, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली ठक या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-२’ या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Recent Posts

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४ आर्थिक लाभ मेष : सदरील काळामध्ये आपल्या बुद्धी-वाणीच्या विकासासह…

21 mins ago

शब्दब्रह्म महावृक्षाच्या छायेत

मधु मंगेश कर्णिक ही अष्टाक्षरे गेली पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ कथा, कविता, कादंबरी, ललितलेखन, व्यक्तिचित्रण,…

41 mins ago

इच्छा…

“लग्न करा. पण नर्सिणीसोबत नको. दुसरी कोणीही चालेल. ही माझी अखेरची इच्छा आहे.” तो मोठ्याने…

59 mins ago

बिवलीचा लक्ष्मीकेशव

कोकणात केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतात. कोकणातील असेच गर्द राईतील अपरिचित शिल्प म्हणजे…

1 hour ago

विचारचक्र

अनेक लोक अतिविचारांनी ताणतणावाच्या चक्रात अडकले जातात. अतिविचार करणे हा मानवी मनाला अडसर ठरू शकतो.…

1 hour ago

‘जगी ज्यास कोणी नाही…’

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे एके काळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आकाशवाणीने फार मोठे योगदान दिले आहे.…

2 hours ago