Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : ही महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा!

Eknath Shinde : ही महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा!

वाशिममध्ये वादळीवाऱ्याला न जुमानता मुख्यमंत्र्यांचं दणक्यात भाषण

यवतमाळ : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसून तयार झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील दौरे करत शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. काल ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal-Washim Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील (Rajshree Patil) यांच्या प्रचारार्थ ते या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी सभेत त्यांच्या भाषणादरम्यान अचानक जोराचा वादळीवारा सुरु झाला. परंतु त्याला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी दणक्यात भाषण केले.

वाशिमच्या मंगरूळपीर येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला मुख्यमंत्री शिंदे संबोधित करीत असताना अचानक जोरदार वादळी वारा सुरू झाला. या वादळी वाऱ्याचा फटका या सभेला देखील बसला. सभास्थळी उभारण्यात आलेल्या भव्य मंचावरील भलं मोठं बॅनर या वादळी वाऱ्याने अक्षरशः उडवून नेलं. मात्र हीच परिस्थिती सांभाळत मुख्यमंत्र्यांनी या वादळीवाऱ्याचा संबंध थेट पंतप्रधानांशी जोडत ही मोदींची हवा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात महायुतीची हवा आहे. अशा अनेक वादळी वाऱ्यांना थोपवणारे आपण आहोत. अशा वादळांना घाबरून जाणारे आपण नसून आपण शिवरायांचे मावळे आहोत. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सभेत रंगत आणली.

वादळवाऱ्यांशी टक्कर घेणारे आपण मावळे आहोत आणि महायुती या वादळवाऱ्यांना टक्कर देणारी आहे. अशी अनेक वादळे आली आणि गेली सुद्धा, मात्र ही महायुती आहे तशीच मजबुतीने आजही उभी आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. आपण टेन्शन घेणारे नाही तर देणारे आहोत. असा मिश्किल शेराही मुख्यमंत्र्यांनी लगावला. ही महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे. वाशिममध्ये सध्या सुरू असलेली हवा ही जयश्री पाटील यांची असून देशाच्या पंतप्रधान पदी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना विराजमान करण्याची ही हवा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

माहेरच्या लेकीला निवडून द्या

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘देशासाठी काम करताना एकही दिवस सुट्टी न घेणारा पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी, मनोज कुमार यांच्या चित्रपटातील ‘रोटी कपडा और मकान’ देणारा पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. विरोधकांकडे सोनिया गांधी, स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे असतील, पण आमच्याकडे फक्त एकच मोदी आहेत’ असंही ते म्हणाले. राजश्री पाटील या माहेरची लेक आहे, त्यामुळे माहेरच्या लेकीला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -