Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीChandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री!

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री!

नालायक लोकांच्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे टॉपला असतील

चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेले दावे आणि टीकांमुळे भाजप नेते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘नालायक’ असा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी पातळी सोडून वक्तव्य केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सोबतच आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) हल्लाबोल केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जगातील कोणत्याही एजन्सीमार्फत १४ कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं तरी या महाराष्ट्रातील लायक व्यक्तींच्या यादीत टॉप क्रमांक एकला माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव असेल. कारण मुख्यमंत्री आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जनतेच्या मनामनांत आहे. तसंच महाराष्ट्रातील सर्वात नालायक लोकांचं जर दुसरं सर्वेक्षण केलं तर त्यात सर्वात टॉपला उद्धव ठाकरे दिसतील, अशी जहरी टीका बावनकुळे यांनी केली.

पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कार्यकाळात काय केलं ते माहित आहे. अडीच वर्षे खिशात पेन नसलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षे विधानमंडळात दोनदा आलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षांत दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा त्यांचा कार्यकाळ या १४ कोटी जनेतेने पाहिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी आणि इतिहास पाहिला तर पहिला निष्क्रीय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. ते मनोरुग्णासारखे, मानसिक स्थिती ढासळल्यासारखे वागतायत. त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, असं मला वाटतं, असं बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं ट्रेनिंग देऊन मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणार होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना कधीच कुणी मुख्यमंत्री काय मंत्रीही केलं नसतं. त्याची काय लायकी आहे? कुठली पंचायत ते पार्लामेंट त्यांनी काम केलं आहे? कधी रेशनकार्ड, आधारकार्ड काढलं आहे? चुकून ते एका मतदारसंघात निवडून आले आहेत, काही वेळेस असं होऊ शकतं. पण त्यांची लायकी आहे का? कोण असा शब्द देईल त्यांना?, असं बावनकुळे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -