Tuesday, May 21, 2024
Homeदेशउत्तर प्रदेशात पुन्हा भाजप

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप

ओपिनियन पोलमध्ये २३९-२४५ जागा मिळण्याचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज ‘टाईम्स नाऊ’ आणि ‘पोलस्टॅट’ यांनी संयुक्तपणे केलेल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार, सत्ताधारी आदित्यनाथ योगी सरकारला ४०३ पैकी २३९-२४५ जागा मिळू शकतात.

समाजवादी पक्ष ११९- १२५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो. बसपा ३० जागांसहीत तिसऱ्या क्रमांकावर आणि ५-८ जागांसहीत काँग्रेसला चौथा क्रमांक मिळू शकतो. ओपिनियन पोलनुसार, उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते.

‘टाईम्स नाऊ-पोलस्टॅट’च्या या ओपिनियन पोलमध्ये ९००० जणांचा समावेश करण्यात आला. ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -