कच्छ: किनारपट्टीला धडकल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग सातत्याने कमी होत आहे. पण, धोका मात्र टळलेला नाही. जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. येथील वाऱ्याचा वेग ताशी ७५ ते ८५ किलोमीटर इतका आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
At 0230 of Today, 16th June the SCS BIPARJOY lay centered over Saurashtra-Kutch region, 30 km north of Naliya. it would further move NE-wards and weaken into a CS by early morning of 16th and into a depression by the same evening over south Rajasthan.
— India Meteorological Department (@Indiametdept) June 15, 2023
गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहत आहेत. समुद्रातून उंच लाटा उसळत आहेत. किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या आधीच्या १७ टीम्ससह एसडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी १५ टीम एअरलिफ्टसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…
Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळाने धडकण्याच्या आधीच ९ जणांचा घेतला बळी