
जळगाव : जळगाव जिल्ह्यात नववर्षाची सुरुवात राड्याने झाली. जिल्ह्यातील पाळधी गावात अफवा पसरली आणि दंगल झाली. अज्ञातांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत बारा ते पंधरा दुकानं जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचण्याआधी हिंसा तसेच जाळपोळ करणारे पळून गेले होते. या घटनेनंतर पाळधी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. सध्या पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे.
नववर्षात रेल्वे देणार चार आकर्षक गिफ्ट
नवी दिल्ली : रेल्वे ही बहुसंख्य भारतीयांसाठी जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे नववर्षात अर्थात २०२५ मध्ये भारतीयांना चार आकर्षक गिफ्ट देण्याची तयारी करत आहे. ...
हाती आलेल्या माहितीनुसार निवडक वाहने वेगाने गावातून गेली. याप्रसंगी वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ केली. या प्रकारावरुन दोन गटांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. हिंसेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
Durgadi To Titwala Train : कल्याणवासीयांसाठी खुशखबर! दुर्गाडी ते टिटवाळा आता २० मिनिटात
ठाणे : वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता वाहतूक कोंडी कमी करण्यासह प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी शहरातील कमी वेळेत जोडणाऱ्या रिंग रोडच्या ...
अफवांवर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. कायदे पाळा. अफवा पसरवू नका. आपल्याला मिळालेल्या संवेदनशील माहितीची पोलिसांकरवी खातरजमा करुन घ्या. बेवारस वस्तूंना हात लावू नका; असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.