नवी दिल्ली : रेल्वे ही बहुसंख्य भारतीयांसाठी जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे नववर्षात अर्थात २०२५ मध्ये भारतीयांना चार आकर्षक गिफ्ट देण्याची तयारी करत आहे. या गिफ्टमुळे प्रवास आणखी आरामदायी, सुरक्षित आणि सुखकारक होणार आहे. रेल्वेच्या गिफ्टचा फायदा सामान्य प्रवाशांपासून ते फर्स्ट क्लास एसीच्या प्रवाशांपर्यंत सर्वांना होणार आहे.
Durgadi To Titwala Train : कल्याणवासीयांसाठी खुशखबर! दुर्गाडी ते टिटवाळा आता २० मिनिटात
भारतीय रेल्वेतून दररोज दोन कोटींपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. या प्रवाश्यांच्या सोयीसाठी दररोज दहा हजारांपेक्षा जास्त रेल्वेगाड्या धावतात. यात वंदे भारत प्रकारच्या गाड्यांना प्रवाशांच सर्वाधिक पसंती मिळत आहे. देशातील वेगवेगळ्या मार्गांवर सध्या ५५ पेक्षा जास्त वंदे भारत गाड्या धावत आहेत. वंदे भारत गाड्यांच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. रेल्वेच्या इतर गाड्यांतील सोयीसुविधांमध्येही वाढ केली जात आहे.
LPG Price: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा, स्वस्त झाला LPG सिलेंडर
१. रेल्वेमार्गे जम्मू : काश्मीर देशाशी जोडणार : रेल्वेमार्गे जम्मू – काश्मीर देशाशी जोडण्याचे काम सुरू आहे. श्रीनगर – कटरा रेल्वे मार्गाची चाचणी सुरू आहे. लवकरच माता वैष्णोदेवी कटरा ते बारामुला अशी वंदेभारत सुरू होणार आहे. कटरा ते बनिहाल हा १११ किमी. चा रेल्वे मार्ग तयार झाला आहे. या मार्गावर ९७.३४ किमी. चा मार्ग हा बोगद्यातून जातो. याच रेल्वे मार्गावर जगातील सर्वात जास्त उंचावर असलेला चिनाब नदीवरचा रेल्वेचा पूल आहे. या पुलावरून रेल्वे धावणार आहे.
२. वंदे भारत स्लीपर ट्रेन : देशात सध्या धावत असलेल्या वंदे भारत गाड्यांपैकी बहुसंख्य गाड्या या चेअर कार स्वरुपातील आहेत. नव्या वर्षात अनेक वंदेभारत स्लीपर ट्रेन पण सुरू होणार आहेत. तसेच नव्या वर्षात वंदे भारत प्रकारातील सर्व गाड्यांमधील सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे. गाडीत प्रवाशांच्या सोयीसाठी वॉटर बॉटल स्टँड पण दिले जातील. वंदे भारत स्लीपर गाड्या या ताशी १३० किमी वेगाने धावाव्यात यासाठीचे नियोजन पण सुरू आहे. यामुळे प्रवास आणखी वेगवान, सुरक्षित, सुखकारक आणि आरामदायी होणार आहे.
३. पंबनचा पूल : तामिळनाडूत पंबन येथे रामेश्वरमला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा समुद्रावरील पहिला सरळ उभ्या रेषेत खुला होणारा पूल उभारण्यात येत आहे. हा २.०५ किमी. लांबीचा पूल आहे. आधीच्या पुलाच्या तुलनेत हा तीन मीटर जास्त उंच आणि समुद्रसपाटीपासून २२ मीटर उंचावर असलेला हा पूल आहे. या पुलावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. जलवाहतुकीच्या सोयीसाठी दिवसातील ठराविक वेळा हा पूल सरळ उभ्या रेषेत खुला केला जाईल.
४. १३३७ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास : देशातील २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील १३३७ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास करण्याच्या योजनेची अमलबजावणी २०२५ मध्ये होणार आहे. रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, मुलांसाठी खेळण्याकरिता सोयी, रेल्वे कियॉस्क, लिफ्ट, प्रतिक्षालय, फूड कोर्ट, वॉशरूम आदी सोयीसुविधा दिल्या जातील.