Thursday, June 19, 2025

Durgadi To Titwala Train : कल्याणवासीयांसाठी खुशखबर! दुर्गाडी ते टिटवाळा आता २० मिनिटात

Durgadi To Titwala Train  : कल्याणवासीयांसाठी खुशखबर! दुर्गाडी ते टिटवाळा आता २० मिनिटात
ठाणे : वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता वाहतूक कोंडी कमी करण्यासह प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी शहरातील कमी वेळेत जोडणाऱ्या रिंग रोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा रस्ता मार्चअखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या रस्त्यामुळे कल्याण ते टिटवाळा अंतर विनाअडथळा २० मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.



कल्याण, डोंबिवलीच्या बाहेरच्या बाजूने जोडणारा रिंग रोड ८ टप्प्यात २०१३ मध्ये प्रस्तावित केला होता. त्याला २०१७ या वर्षात मान्यता मिळाली. अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन, घरे, उत्पन्न देणारी झाडे आदी बाधीत होत असल्याने त्याचा रोख मोबदला मिळावा, ही मागणी करत जागा देण्यास रहिवाशांनी विरोध केला. तरीही प्रशासनाकडून दुर्गाडी ते टिटवाळा या रस्त्याच्या क्र. ४ ते ७ या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली. आता या रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

या कामात आधारवाडी डम्पिंगचा मोठा अडथळा होता. MMRDA ने डम्पिंग हटवले जात नाही तोपर्यंत रस्ता पूर्ण होऊ शकणार नसल्याचा अभिप्राय दिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून डम्पिंगवर कचरा टाकणे बंद करत येथे बायोमायनिंग पद्धतीने डम्पिंग बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >