
- समर्थ कृपा : विलास खानोलकर
स्वामी वदती भक्तासी काय हवे ते पुसे मजसी ||१|| भक्त बोले आली होळी गरिबीतही कशी खावी पोळी ||२|| मुला-बाळांसह कशी करावी रंगपंचमी कशी स्तवावी ||३|| खिशात नाही पै पैसा पाहुण्यासी कैसे बोलावे बैसा ||४|| नाही विहिरीला पाणी नाही नदीला पाणी ||५|| उन्हाळ्याने सुकले तळीपाणी सुकले मुख सुके गळापाणी ||६|| पाहुनी आकाशी जीवने नकोशी कडक उन्हाने तापली तक्तपोशी ||७|| पिके सुकली मने सुकली हात पसरूनी माने झुकली ||८|| चाऱ्याचे दुर्भिष्य सूर्याहाती धनुष्य वाटे आत्महत्येने संपवावे आयुष्य ||९|| आजोबा नातवंडासाठी ढकलतो आयुष्य आजी सांभाळी नक्षत्र पुष्प ||१०|| खाटकापाशी चालली गाईवासरे घराघरात द्रारिद्र्य असे पसरे ||११|| सावकार घिरट्या घाली दारी काळे कभिन्न पठाण दारोदारी ||१२|| स्वामी वदे आधुनिक भक्तासी नको काळजी ठेवू उषासी ||१३|| उषःकाल उगवेल उद्याशी यश येईल तुझ्या पायाशी ||१४|| विश्वास ठेव त्या दत्तात्रयाशी विश्वास ठेव त्या महादेवाशी ||१५|| विश्वास ठेव ब्रह्माविष्णूशी विश्वास ठेव हनुमान रायाशी ||१६|| विश्वास ठेवत्या श्रीरामाशी विश्वास ठेव त्या श्रीकृष्णाशी ||१७|| प्रसन्न अग्निदेवी होलिका जीवनात फुलेल गुलाब कलिका ||१८|| नका जाळू हिरवी झाडे वाढली दारोदारी लाडेलाडे ||१९|| दुर्गुणा ते जाळा मारूनी कोडे नका करू धुरांचे लोंढे ||२०|| कपाळी गुलाल लावूनी करा रंगपंचमी विषारी रंगाने नका करू रंगपंचमी ||२१|| नका पिऊ नवसागराची दारू नका शोधू रात्री बेरात्री पारू ||२२|| नका खेळू पत्ते जुगार बंद करा जन्नामन्ना जुगार ||२३|| बंद करा इंटरनेट जुगार बंद करा बीटकॉईन जुगार ||२४|| मोबाइलचाही अतिरेक बंद करा रामरक्षा, ज्ञानेश्वरी हाती धरा ||२५|| मनाचे श्लोक, अभंग, मनीधरा नामदेव तुकाराम मस्तकी धरा ||२६|| वाईटमार्ग, शिव्याशाप बंद करा आजी-आजोबांना वरिष्टांना प्रणाम करा ||२७|| आईवडील भावंडांना हृदयी धरा गोरगरिबांना मदत करा ||२८|| नैसर्गिकरीत्या शेती करा नदिनालीतळी साफ करा ||२९|| विहिरी, गावतळी स्वच्छ करा कौलारूपाणी सांभाळ करा ||३०|| उंच बिल्डिंग पाणी जपुनी धरा थेंब थेंबपाणी पुनर्वापर करा ||३१|| नका करू नातलगांशी कट पुरणपोळी कट करा गट्ट ||३२|| संसारात रोजरोज नको कटकट संसार सुखाने बिनकटकट ||३३|| राधाश्रीकृष्ण व्हा पट पट बालगणपती व्हा पटापट ||३४|| ऐका सुदामा बलरामाची वटवट दहीभात पोहे खा पटपट ||३५|| बालहनुमान व्हा पटपट बालशिवाजी व्हा झट झट ||३६|| सानेगुरुजीचा व्हा श्याम चट पट बालपणात शिरा पटापट ||३७|| छळणे, पिळणे विसरा पटापट आनंदाने नाचा, डोला पटापट ||३८|| खळाखळा हसा पटापट प्या हळदीदूध पटापट ||३९|| फुटाण्याचा प्रसाद वाटा झटपट पेढे वाटा पटपट ||४०|| आनंदाचा घ्या तीर्थप्रसाद पटापट आनंदी आनंद होईल पटापट ||४१|| होईल होळी आनंदी पटपट रंगपंचमी आनंदी पटपट ||४२|| स्वामी सांगे विलासा मंत्र पटपट उज्ज्वल आयुष्य भेटेल झटपट ||४३|| रंगुनी रंगात रंग माझा वेगळा मोरपिसापरी छान तो नव्हाळा ||४४|| इंद्रधनुष्यापरी मी आकाशी वेगळा सप्तरंगात असूनी मी तो वेगळा ||४५|| ब्रह्माविष्णुमहेशातही मी वेगळा दत्तात्रयाच्या अत्तराहूनी मी वेगळा ||४६|| गावागावात सुंगध माझा वेगळा औंदुबर, वटसावित्रीचा वड वेगळा ||४७|| मी गुलाबातल्या गुलाबी रंगात मी सोनचाप पिवळ्या रंगात ||४८|| मी सुंगधी मोगऱ्याच्या सफेद रंगात मी सुंदर जास्वंदाच्या लाल रंगात ||४९|| मी मेहंदीच्या पानात हिरव्या रंगात मी कण्हेरीच्या तांबड्या रंगात ||५०|| गंगेच्या पाण्यापरी मी साऱ्या रंगात सुखदुःखाच्या वेळी मी साऱ्या ढंगात ||५१|| आदी मी अनादी मी अमर मी आनंदी होळी संदेश देतो स्वामी ||५२||