
सिलिगुडी : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची अचानक मंचावर तब्येत बिघडली. कार्यक्रम सुरु असतानाच त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना त्रास जाणवू लागला आहे. कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील डागापूरमधील कार्यक्रमाला सिलीगुडीतील दगापूर येथे कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागले.यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आहेत.
Meta : संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
गडकरी यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचीही माहिती आहे. अस्वस्थ जाणवू लागल्यानंतर गडकरींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांना आराम करण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे.