Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीBEST App : ‘चलो ॲप’ वापरकर्त्यांच्या पैशांची होणार बचत

BEST App : ‘चलो ॲप’ वापरकर्त्यांच्या पैशांची होणार बचत

बेस्ट उपक्रमाचा ‘सुपर सेव्हर’ प्लॅन

मुंबई (वार्ताहर) : ‘बेस्ट चलो ॲप’ आणि ‘बेस्ट चलो कार्ड’ (BEST App) वापरणाऱ्या प्रवाशांच्या पैशांची आता बचत होणार आहे. कारण बेस्ट उपक्रमाने ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमुळे बेस्ट प्रवाशांच्या पैशांमध्ये सुपर सेव्हिंग होणार आहे.

बेस्टचे तिकिट आधीच कमी आहे. सर्वसाधारण बससाठी किमान पाच तर एसी बससाठी किमान सहा रुपये तिकिट आहे. त्यातही आता ‘बेस्ट चलो ॲप’ आणि ‘बेस्ट चलो कार्ड’ वापरकर्त्यांसाठी ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन आणला आहे. बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो कार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ३४ टक्के सवलत दिली जाणार आहे. बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅन बेस्टच्या ॲप तसेच चलो कार्डवरही उपलब्ध असणार आहे. १ डिसेंबरपासून चलो ॲपवर या प्लॅनची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तर चलो कार्डवर ३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार प्रवाशांना बेस्ट वाहकाच्या माध्यमातून किंवा प्लॅन खरेदी करून याचा वापर करता येणार आहे.

मुंबईत सुमारे ३० लाख प्रवाशांनी चलो ॲप डाऊनलोड केले असून सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी त्याचा दररोज वापर करत आहेत. नोव्हेंबरमध्ये पाच लाख डिजिटल फेऱ्या दिवसाला होत होत्या. डिजिटल तिकिट प्रणालीचा अवलंब केल्यापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईकरांनी आणखी डिजिटल प्रणालीचा वापर करून प्रवास करावा, यासाठी हा नवीन प्लॅन बेस्ट उपक्रमाने तयार केला आहे. या प्लॅनमुळे डिजिटल प्रणालीचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास बेस्टला आहे.

बेस्ट चलो ॲपमधील बस पास सेक्शनमध्ये हा प्लॅन उपलब्ध आहे. आपल्या सोयीनुसार प्लॅन निवडून, स्वत:ची माहिती भरून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर प्लॅनची खरेदी करता येईल. बेस्ट बसमध्ये चढल्यानंतर ‘स्टार्ट अ ट्रीप’वर क्लिक करा, त्यानंतर फोनद्वारे तिकिट मशीनवर व्हॅलिडेट करा. व्हॅलिडेशन यशस्वी झाल्यानंतर वाहकाद्वारे डिजिटल तिकिटची प्रिंट मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -