Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीबाळंगगा धरणग्रस्तांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

बाळंगगा धरणग्रस्तांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

पेण : राज्यासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक आयोगाकडून शंभर टक्के मतदानासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

बाळगंगा धरणाचे काम २०१० पासून सुरू झाले असून जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाला १३ वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जावळी, वरसई, करोटी, निधवली, गागोदे आणि वाशिवली या सहा ग्रामपंचायतीतील ९ महसुली गावे आणि १३ आदिवासी वाड्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून प्रकल्पामुळे तीन हजारांहून अधिक कुटुंबे विस्थापित झाले.

हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांनी बाळगंगा प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष केले आहे. १३ वर्षांपासून बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींनीकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यंदा मतदान न करता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार निर्धार केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -