Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीVasant More : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती

Vasant More : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती

पुणे लोकसभेतून केली उमेदवारीची मागणी?

जालना : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने उमेदवार उभा करण्यासाठी मराठा समाजाने (Maratha Samaj) हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मार्गदशनाखाली अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवाची बैठक बोलवण्यात आली होती. आज सकाळपासून ही बैठक सुरु आहे. संध्याकाळी बैठकीतील निर्णयाबाबत मनोज जरांगे माहिती देणार आहेत. दरम्यान, नुकतेच मनसे पक्षातून बाहेर पडलेले नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी या सभेला उपस्थिती दर्शवली. पुणे लोकसभेतून (Pune Loksabha) उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी त्यांनी ही हजेरी लावली असल्याचे समजत आहे.

मराठा समाजाच्या आजच्या बैठकीत जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत असे कार्यकर्ते आपापल्या गावातील झालेल्या चर्चेचा अहवाल या ठिकाणी घेऊन आले होते. राज्यातील ३६ लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्यांचे वाचन व अभ्यास त्यांनी केला. या बैठकीत निवडणूक लढवणे, उमेदवार उभे करणे, पुढील दिशा ठरवणे यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासोबतच पुणे लोकसभा निवडणुकीकरता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले आहेत की, मला राजकारण करायचे नाही, माझा तो मार्ग नाही समाजाची जी भूमिका असेल त्या पुढे मी जाणार नाही असे जरांगे यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

भेट झाली, पण चर्चा झाली नाही – वसंत मोरे

वसंत मोरे आजच्या भेटीसंदर्भात म्हणाले की, पुणे लोकसभा निवडणुकीत मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे, त्या करीता मी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आलो होतो. आज त्यांना पुण्याचा अहवाल समाज बांधवांनी दिला. आज मनोज जरांगे यांची भेट झाली, पण चर्चा झाली नाही. कागदावर त्यांना माहिती दिली आहे. तसेच काल वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो आहे.

मी मनसे पक्ष सोडला तसे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी सकल मराठा समाजाचा पाईक आहे. आमच्या पुण्याच्या लोकांनी आमची माहिती दिली आहे आणि त्यामध्ये माझी बाजू मांडली आहे. जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील अशी अपेक्षा आहे. माझी परत एकदा जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा होणार आहे असेही वसंत मोरे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -