Tuesday, May 21, 2024
Homeमहत्वाची बातमीबैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू

बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू

शिवसेनेकडून कारवाई सुरू

मुंबई : बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असे पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आले आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना पत्र पाठवले आहे. बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचे या पत्रातून आमदारांना ठणकावून सांगितले आहे.

शिवसेनेचे पाटणचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आणि राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज म्हणजेच, बुधवार २२ जून, २०२२ रोजी, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल, पत्यावर पाठवण्यात आली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एसएमएस द्वारेही पाठवण्यात आली आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे दिल्याशिवाय या बैठकीला तुम्हाला गैरहजर रहाता येणार नाही.

सदर बैठकीत आपण उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदीं नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -