Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीSalaar Movie : नेहमीप्रमाणे प्रभासचा 'सालार'ही प्रदर्शित होताच झाला ऑनलाईन लीक!

Salaar Movie : नेहमीप्रमाणे प्रभासचा ‘सालार’ही प्रदर्शित होताच झाला ऑनलाईन लीक!

तरीही करणार भरघोस कमाई…

मुंबई : बिग बजेट सिनेमा (Big Budget Cinema) प्रदर्शित झाल्या झाल्या तो अनधिकृत साईट्सवरुन (Unofficial sites) लीक होणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. नुकताच प्रदर्शित झालेला ‘अ‍ॅनिमल’ (Animal) सिनेमाही लगेच लीक झाला होता, मात्र तरीही या सिनेमाने ५०० कोटींचा पल्ला गाठलाच. तर शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण, जवान या सिनेमांनीही ऑनलाईन लीक (Online leak) होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते. असं असलं तरी चाहते मात्र निर्मात्यांची निराशा करत नाहीत. सिनेमा लीक झाला तरी अनेक चाहते तो चित्रपटगृहात जाऊनच पाहतात. त्यामुळे बिग बजेट सिनेमा बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यशस्वी होतो.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित सिनेमा ‘सालार’ (Salaar) आज प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येही (Advanced Booking) बाजी मारली होती. तब्बल ४०० कोटींचं बजेट असणारा हा सिनेमा आहे. कलाकारांनीही तितकंच तगडं मानधन घेतलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ‘सालार’ प्रदर्शानानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक झाला.

‘सालार’चं एचडी व्हर्जन तमिळ रॉकर्स, फिल्मीझिला, टेलिग्राम अशा आणखी काही पायरसी साइट्सवर लीक झालं आहे. तरीही सिनेमाचा प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा सिनेमा ३५ ते ४० कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘सालार’ सिनेमा हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगु भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘सालार’बरोबरच शाहरुख खानचा ‘डंकी’देखील ऑनलाइन लीक झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -